अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
अश्या परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य नसल्याने अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा 27 जून 2021 रोजी होणार होती.
मात्र आता ती 10 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय यूपीएससी ने घेतला आहे.
त्यामध्ये आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचीही भर पडली आहे. देशात यापूर्वीही कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
परंतु, युपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्यासोबत नव्या तारखा जाहीर केल्यामुळे विद्यार्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भात नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.