UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. तसेच हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे तुम्हाला बहुरूपी ज्ञान असणे आवश्यक आहे.
दरम्यान, यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : ‘मांजरा पठार’ हे महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये स्थित आहे?
उत्तर : मराठवाडा
प्रश्न : रंगाचे ज्ञान होण्यासाठी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात?
उत्तर : शंकू पेशी
प्रश्न : मध्य व पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोणते आहे?
उत्तर : मुंबई
प्रश्न : ‘शेकरू’ कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे?
उत्तर : महाराष्ट्र
प्रश्न : ‘पंढरपूर’ या ठिकाणाला महाराष्ट्रातील कोणती राजधानी म्हणून ओळखले जाते?
उत्तर : अध्यात्मिक
प्रश्न : प्रसिद्ध असलेले ‘हडप्पा’ हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले होते?
उत्तर : रावी नदी