UPSC Interview Questions : UPSC परीक्षा (UPSC Exam) पास झाल्यानंतर महत्वाचा टप्पा मानला जातो तो म्हणजे मुलाखत (Interview) होय. मुलाखतीत उमेदवाराला (Candidate) असे काही सोप्पे आणि विचारात पाडणारे प्रश्न (Questions) विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळून जातो.
अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची (IAS Interview) व्हायला हवी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो परंतु उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात.
UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न: अशी कोणती वस्तू आहे जी तुम्ही एखाद्याला देऊ शकता आणि ती एकाच वेळी आपल्याजवळ ठेवू शकता?
उत्तरः जीभ ही एक अशी वस्तू आहे जी तुम्ही एखाद्याला देऊ शकता आणि आपल्याजवळ ठेवू शकता.
प्रश्न: जगात किती धर्म आहेत?
उत्तरः हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम आणि शीख हे सर्वात लोकप्रिय 5 धर्म आहेत. परंतु जगात 300 हून अधिक आहेत आणि 12 विशेष धर्म आहेत.
प्रश्न: 1 वर्षात किती तास असतात?
उत्तर: 8760.
प्रश्न: 1 महिन्यात किती तास असतात?
उत्तर: 730.01
प्रश्न: हत्ती आपल्या सोंडेत किती पाणी धरू शकतो?
उत्तर: 5 लिटर.
प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे जी महिन्यातून एकदा येते आणि 24 तास पूर्ण करून निघून जाते?
उत्तर: तारीख.
प्रश्न- कोणत्या खोलीला खिडकी किंवा दरवाजा नाही?
प्रश्नः मशरूम.
प्रश्न- कोणते शहर माशाच्या आकाराचे आहे?
उत्तर- राजस्थानमधील जालोर शहर.