UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला बहुरूपी ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही काही प्रश्न घेऊन आलो आहे ज्याची उत्तरे तुम्ही जाणून घ्या.
UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते.
जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (आयएएस मुलाखत) असावी. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, ज्यामध्ये मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न : आय. पी. एस अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते?
उत्तर : केंद्रीय लोकसेवा आयोग
प्रश्न : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : ठाणे व रायगड
प्रश्न : भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
उत्तर : हैद्राबाद
प्रश्न : महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे?
उत्तर : पुणे
प्रश्न : महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केली गेली?
उत्तर : सन १९७९
प्रश्न : तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश