UPSC Interview Questions : अनेक तरुण विद्यार्थ्यांचे UPSC मध्ये उत्तीर्ण होण्याचे स्वप्न असते. मात्र काहींचे हे स्वप्न पूर्ण होते आणि काहींचे नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण (Passed) झाल्यांनतर मुलाखत हा खूप महत्वाचा टप्पा असतो. यामध्ये असे अनेक प्रश्न (Questions) विचारले जातात ते ऐकून आपण गोंधळात पडू शकतो. मात्र त्याचे उत्तर इतके सोप्पे असते पण आपल्याला आठवत नाही.
अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची (IAS Interview) असावी.
हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये (Interview panel) बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.
यूपीएससीच्या मुलाखतींमध्ये असे अनेकदा दिसून येते की, मुलाखतकाराचा प्रश्न सोपा असतो पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात.
UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. ज्यावरून तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना येऊ शकते.
प्रश्न: कल्पना करा की तुम्ही जहाजात आहात आणि ते जहाज बुडत आहे, मग तुम्ही कसे वाचाल?
उत्तरः उमेदवार म्हणाले- कल्पना करणे थांबवा आणि तुमचे रक्षण होईल.
प्रश्न: तो कोण आहे ज्याला बुडताना पाहून कोणीही वाचवायला येत नाही?
उत्तरः उमेदवारांनी अतिशय हुशारीने उत्तर दिले आणि म्हणाले – सूर्यास्त पाहून कोणीही त्याला वाचवायला येत नाही.
प्रश्न- कोणता देश आहे जेथे सार्वजनिक वाहतूक मोफत आहे?
उत्तर- लक्झेंबर्ग हा देश आहे जिथे वाहतूक पूर्णपणे मोफत आहे.
प्रश्न: शहाजहानने एकमेव पांढरा ताजमहाल का बांधला?
उत्तरः शाहजहानने पांढरा रंग निवडला, हा त्याचा निर्णय असू शकतो, पण मकरानाचा संगमरवर इतर ठिकाणच्या संगमरवरापेक्षा चांगला मानला जातो. मकराणाच्या संगमरवरावर आम्लाचा कोणताही परिणाम होत नाही.
प्रश्न- जेवढे जास्त स्वच्छ केले जाईल तेवढे काळे होईल असे काय आहे?
उत्तर- ब्लॅक बोर्ड जितका जास्त स्वच्छ केला जाईल तितका तो काळा होतो.
प्रश्न- अशी कोणती गोष्ट आहे जी खायला विकत घेतली जाते पण पेरली जात नाही?
उत्तर- जेवणाचे ताट पेरले जात नाही.
प्रश्नः जगातील एकमेव असा देश कोणता आहे जिथे एकही साप आढळत नाही?
उत्तरः न्यूझीलंड हा जगातील असा देश आहे जिथे एकही साप आढळत नाही.