Smartphone Tips and Tricks : दैनंदिन जीवनातील स्मार्टफोन हा एक महत्त्वाचा घटक बनला आहे. सध्याच्या युगात अनेकाकांकडे स्मार्टफोन आहे. त्याचबरोबर भारतीय बाजारात नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात.
परंतु, अनेक वापरकर्ते स्मार्टफोन घेतला की काही चुका करतात. त्यामुळे त्यांचा नवीन स्मार्टफोन लवकर खराब होतो. जर तुम्हीही या चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा.
दिवसभर फोनचा जास्त वापर केल्याने फोनच्या बॅटरीवर वाईट परिणाम होतो. याशिवाय काही चुका केल्याने फोनचे आयुष्य कमी होऊ लागतात. यामुळेच तुमचा नवा स्मार्टफोन जुना दिसतो आणि अगदी सुरुवातीला जुन्या फोनप्रमाणेच समस्या सुरू होतात. फोन लवकर खराब होऊ नये असे वाटत असेल तर काही खास गोष्टी लक्षात ठेवा.
सुरक्षिततेची काळजी घ्या
फोनचा वापर सुरक्षिततेचा विचार करूनच केला पाहिजे. थोडासा निष्काळजीपणा तुमचा नवीन फोन जुना होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या फोनच्या डिस्प्लेवर टेम्पर्ड आणि कव्हर नक्कीच ठेवा. कॅमेरा लेन्सच्या सुरक्षिततेसाठी, त्यावर काच असल्याची खात्री करा. यामुळे फोन तुटण्यापासून वाचू शकतो.
जास्त चार्जिंग
रात्री झोपताना फोन कधीही चार्जिंगवर ठेवू नये. अशा स्थितीत तुमचा स्मार्टफोन ओव्हरचार्ज होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. अशावेळी फोन लवकर खराब होऊ शकतो. लक्षात ठेवा की जेव्हा फोन 100 टक्क्यांपेक्षा कमी असेल तेव्हाच चार्जिंगपासून दूर करा.
हा फास्ट चार्जर वापरू नका
जलद चार्जिंगच्या पार्श्वभूमीवर तुमच्या स्मार्टफोनचा मूळ चार्जर वापरणे थांबवू नका. फास्ट चार्जरने फोन चार्ज केल्याने बॅटरीवर जास्त भार पडतो आणि नंतर फोनमध्ये समस्या येऊ लागतात. त्यामुळे तुमचा फोन नेहमी मूळ चार्जरनेच चार्ज करा.