Room Heater : जास्त वेळ रूम हीटर वापरताय? वेळीच सावध व्हा, नाहीतर..

Published by
Ahmednagarlive24 Office

Room Heater : थंडीच्या दिवसांत जास्तीत जास्त स्वेटर आणि हीटरचा वापर केला जातो. त्यामुळे उबदार वाटते. परंतु, त्याचा अतिवापर झाला तर ते आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचा तसेच आपल्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते.

जर तुम्ही जास्त वेळ रूम हीटरचा वापर करत असाल तर बातमी काळजीपूर्वक वाचा. नाहीतर तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो तसेच ते जीवघेणेही ठरू शकते.

अनेक तज्ञ असे सांगतात की रूम हीटर वापरताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. हीटरचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.

डोळे निरोगी राहण्यासाठी ते ओले असणे खूप गरजेचे आहे. डोळे कोरडे राहिले तर आजारी पडण्याची शक्यता खूप असते. तुम्ही जर बराच वेळ रूम हीटर वापरला तर डोळ्यातील ओलावा कमी होतो. डोळे कोरडे असताना संसर्गाचा धोका खूप वाढतो.

अशा परिस्थितीत जर तुम्ही जास्त वेळ रूम हीटर वापरला तर डोळ्यांशी निगडीत समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या खोलीत जास्त वेळ रूम हीटर चालू ठेवू नका.

Ahmednagarlive24 Office