Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

UTS App : तिकिटासाठी रांगेत ताटकळत बसण्याची गरज नाही, या अ‍ॅपमुळे मिनिटात बुक होईल तिकीट

देशातील दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. प्रवासासाठी गरजेचे असते ते म्हणजे तिकीट. जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

UTS App : रेल्वेचा प्रवास हा सर्वात स्वस्त आणि आरामदायी मानला जातो. त्यामुळे कोट्यवधी जनता रेल्वेने प्रवास करत आहेत. परंतु, जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे तिकीट असावे. जर तुम्ही रेल्वेचा प्रवास तिकिटाशिवाय करत असाल तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

हा आर्थिक फटका टाळण्यासाठी तिकीट खरेदी करूनच रेल्वेने प्रवास करा. परंतु, तिकीट खरेदी करण्यासाठी अनेकवेळा लांबच लांब रांगेत उभे राहावे लागते. तुम्ही आता रांगेत उभे न राहता तिकीट खरेदी करू शकता. होय, तुम्ही आता UTS अ‍ॅपवरून तिकीट खरेदी करू शकता.

तुम्हाला Play Store वरून भारतीय रेल्वे UTS अ‍ॅप सहज डाउनलोड करता येत आहे. यासाठी तुम्हाला फक्त गुगल प्ले स्टोअरवर UTS अ‍ॅप लिहून सर्च करावे लागणार आहे. तुम्ही सर्च करताच हे अ‍ॅप तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तुम्ही ते फक्त एकाच क्लिकवर डाउनलोड करू शकता.

हे लक्षात ठेवा की UTS अ‍ॅपवर तिकीट बुक करण्यासाठी, सर्वात अगोदर तुम्हाला कोणताही एक मोड उघडावा लागणार आहे. यात तुम्ही नॉर्मल बुकिंग, प्लॅटफॉर्म बुकिंग किंवा सीझन बुकिंगचा पर्याय निवडू शकता. पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला पेपरलेस किंवा प्रिंट तिकीटाचा पर्याय निवडावा लागणार आहे.

ही प्रक्रिया केल्यानंतर, तुमचे सुरुवातीचे स्टेशन आणि गंतव्य स्थानक प्रविष्ट करा. त्यानंतर तुम्हाला पुढील बटणावर क्लिक करून विचारण्यात आलेली आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागणार आहे.

आता सर्वात शेवटी तुम्हाला पेमेंट करावे लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच तुमचे तिकीट बुक केले जाणार आहे. तुम्हाला हे अॅप हिंदी, इंग्रजी आणि कन्नड या तीन भाषांमध्ये वापरता येते.