अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-सध्या तालुक्यात करोना आजाराने थैमान घातले आहे. यापासून आपला व कुटुंबाचा बचाव व्हावा म्हणून नागरिक लसीकरण केंद्रावर धाव घेताना दिसतात.
परंतु लसीचा पुरवठा कमी असल्याने दररोज लस घेण्याकरिता जवळपास पाचशे नागरीक पहाटे 4 वाजेपासून शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गर्दी करतात. यामुळे लसीकरण केंद्रावर मोठा गोंधळ पाहायला मिळतो आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे नागरिकांचा लसीकरणाकडे ओघ वाढला आहे. दरम्यान कोरोनाची भीती वाढल्याने आपल्याला लस मिळावी या अपेक्षाने सर्वसामान्य नागरिक लस घेण्याकरिता पहाटे चार वाजता ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहे.
नागरिकांची वाढती गर्दीमुळे करोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली असल्याने मोठा गोंधळ उडाला होता. दररोज पहाटे रुग्णालयात घेऊन लसीकरणासाठी होणार्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
परंतु जितका साठा उपलब्ध आहे तेवढेच टोकन प्रथम रांगेत येणार्या नागरिकांना दिले जाते. परिणामी ज्यांना टोकन मिळाली नाही ते रुग्णालयाच्या आवारात गोंधळ घालतात. दरम्यान सध्या जिल्ह्यात लसीकरणासाठी टोकण पद्धत सुरु करण्यात आली आहे.
या उपक्रमाचे राज्यात कौतुक होत आहे. या पद्धतीचे अनुकरण संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. राहाता तालुक्यात 52 हजार नागरिकांचे लसीकरण पहिला डोस साठी चाळीस हजार तर दुसर्या डोस साठी तेरा हजार नागरिकांचा सहभाग घेतला आहे.