अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-सध्या १८वर्षा पुढील सर्वांना कोरोना प्रतीबंधात्मक लस दिली जात आहे. मात्र लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असतो.
म्हणून हे लसीकरण केंद्रच कोरोनाचे हॉटस्पॉट बनु नये. यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.
नगर तालुक्यातील जेऊर येथे कोरोना व लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना ना.तनपुरे यांनी कोरोना लसीकरणाच्या वेळेस गर्दी होणार नाही.योग्य नियोजन करून लसीकरण प्रक्रिया पार पाडण्यात यावी जेणेकरून लसीकरण केंद्र कोरोनाचे हॉट स्पॉट बनणार नाहीत.
अशा सुचना ना.तनपुरे यांनी आरोग्य विभागाला दिल्या. राज्यात लसीचे सर्वत्र समप्रमाणात वाटप सुरु आहे. लसीकरणा च्या वेळेस दुस-या डोस वाल्यांना प्राधान्य देण्यात यावे. अगोदरच नियोजन करून लस देणाऱ्या व्यतिरिक्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
लसीकरणा मध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची ग्वाही ना.तनपुरे यांनी दिली. तसेच नागरिकांनी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.
जेऊर येथील कोविड सेंटर गावात मध्यभागी असल्याने ते दुसरीकडे हलविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
सेंटरसाठी पर्यायी जागा पाहून लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच येथील कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजनची सुविधा करण्याबाबत तहसीलदारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती तनपुरे यांनी दिली.