केडगावात ‘या’ ठिकाणी सुरु करण्यात आले लसीकरण केंद्र

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- केडगाव येथील आरोग्य केंद्र हे फक्त एकच लसीकरण केंद्र असल्याने या ठिकाणी केडगाव भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होती.

त्यावर नियंत्रण ठेवून गर्दी कमी करण्यासाठी आणखी एक लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती.

त्यानुसर या मागणीला यश आले असून केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

यावेळी मा नगरसेवक सुनील कोतकर म्हणाले की केडगाव येथील लसीकरण केंद्रापासून लांब असलेले भाग मराठा नगर, एकनाथ नगर, वैष्णव नगर, उदयनराजे नगर, शिवाजीनगर या भागातील नागरिकांना लसीकरण केंद्र लांब पडत असून

येथील नागरिकांना लसीकरण जवळ उपलब्ध करण्यासाठी भाग्योदय मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र चालू करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी लस घेण्याचे आव्हान कोतकर यांनी केले.

विश्वेश्वर प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेश सातपुते यांच्या प्रयत्नातून केडगाव येथील भाग्योदय मंगल कार्यालय येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले.

दरम्यान आणखी एक लसीकरण केंद्र सुरु झाल्याने आता नागरिकांची लसीकरणासाठीची पळापळ काहीशी कमी होण्यास मदत होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24