अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.
मात्र अनेकदा लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने लसीकरण ठप्प झाले होते. यातच आता 18 वर्ष वयोगटातील युवकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे.
यातच गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेला ज्येष्ठांचा कोरोना लसीचा दुसरा डोस उद्या मंगळवारपासून सुरू होणार आहे.दरम्यान महापालिकेच्या सातही केंद्रावर हा डोस दिला जाणार आहे.
उद्या मंगळवार रोजी कोव्हॅक्सिन तर बुधवारी कोवीशिल्डचा डोस दिला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली.
18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने दिलेले डोस संपले आहेत. त्यामुळे पुढचे डोस येईपर्यंत या वयोगटाचे लसीकरण उद्यापासून नगर शहरात बंद असेल, असे डॉ. बोरगे यांनी सांगितले.