अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-१३५ कोटी लोकसंख्येच्या भारत देशासाठी एका रात्रीतून लस उत्पादिक करणे शक्य होणार नाही. ‘करोना प्रतिबंधक लशीचे उत्पादन करण्यास कंपन्यांना मर्यादा आहेत.
असे प्रतिपादन पुण्यातील सिरम इस्टट्युटचे मालक अदर पुनावाला ब्रिटनमध्ये बोलले ते खरच बोलले आहेत.
असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अदर पुनावाला यांची पाठराखण केली आहे. जगासह भारतात कोरोना महामारीने थैमान घातले आहे .
त्यामुळे प्रत्येकाला वाटते ‘आम्हाला लस पाहिजे म्हणून सगळे जण पुनावाला यांना दमच देत सुटले होते. त्यामुळे ब्रिटनमध्ये जाऊन ते जे बोलले ते खरेच बोलले. असून एवढ्या मोठ्या देशासाठी एक रात्रीतून लस बनविता येऊ शकत नाही. त्यांचे हे म्हणणे खरेच आहे.
अदर पुनावाला हे काही राजकारणी नाहीत. त्यामुळे ते काही बोललेलं आहेत त्यात तथ्य असून उत्पादनातील मर्यादा लक्षात घेऊन जेवढा कोटा मिळत आहे, त्याचे काळजीपूर्वक नियोजन केले पाहिजे.
महाराष्ट्र राज्याला जास्त कोटा मिळावा म्हणून आपण प्रयत्न करीत आहोत अशी प्रतिकिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. दरम्यान सध्या देशात लसीकरणाच्या वाटपावरून राजकरण सुरु आहे.
तसेच देशात सर्वाधिक रुग्णसंखया असलेल्या महाराष्ट्राला केंद्राकडून सातत्याने झुकते माप दिले जात आहे. यामुळे राज्याला जास्तीत जास्त लस पुरवठा कसा होईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.