अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात शनिवारी दिवसभर लसीचा तुटवडा होता. जिल्ह्यात दररोज १० ते १४ जणांना लस दिली जात होती शनिवारी मात्र २ हजार ४३५ जणांनाच लस देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व शहरी भागात लसीकरणासाठी अनेक जणांनी चकरा मारल्या मात्र लस मिळाली नाही जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी चक्क लसन असल्याचा फलक लावण्यात आला.
पॉझिटिव्ह रुग्ण सातत्याने वाढत असतानाच लसीचा वेग मात्र काहीसा मंदावलेला आहे. नगर जिल्ह्यात जिल्हा शासकीय रुग्णालय उप शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस दिली जात आहे.
मात्र लसीला मागणी वाढली असतानाच लस मिळत नसल्याने मोठा तुटवडा शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जाणवत आहे रविवारी बहुतेक ठिकाणी शिल्लक नव्हती.
शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात व लस केंद्र परिसरात लस शिल्लक नसल्याचा फलक लावण्यात आला होता.
नगर जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ३०हजार १६०जणांना लक्ष देण्यात आली असून रविवारी केवळ २ हजार ४३५ जणांनाच डोस देण्यात आला आहे.