अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. यातच लसीकरण मोहिमेला नागरिकांचा देखील सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.
यामुळे जिल्ह्यात लसीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र असे असताना जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवतो आहे. मागणीच्या तुलनेत अत्यल्प पुरवठा होत असल्याने महानगर पालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
कोरोना लस उपलब्ध होत नसल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांनाच फक्त लस देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पहिला डोस दिला जाणार असल्याचे आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले.
तसेच शासानाकडून लस उपलब्ध झाल्यानंतर पहिला व दुसरा, असे दोन्ही डोस घेणाऱ्यांना लस दिली जाणार आहे. कोरोनावरील लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु, लस उपलब्ध होत नाही.
नगर शहरासाठी २ ते ३ हजार इतके डोस उपलब्ध हाेत आहेत. त्यात शासनाने १८ वर्षांपुढील सर्वांना डोस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी गर्दी होईल, या भीतीनेही केंद्रांसमोर रांगा लागल्या आहेत.
परंतु, त्याप्रमाणात लस उपलब्ध होताना दिसत नाही. लस मिळत नसल्याने केंद्र बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर ओढावली आहे. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांना लस मिळत नाही.
जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत दुसरा डोस घेणाऱ्यांनाच फक्त लस देण्याच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे.