अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र कृषक समाज संघटना व स्व. सुभाष गांगड मित्र मंडळाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील चौक सुशोभीकरण लोकार्पण सोहळा,
कृषक समाज संघटना व मुस्लिम समाज यांच्या वतीने सैयारा-ऐ-आखीरतचा (स्वर्ग रथ) लोकार्पण सोहळा तसेच शहरातील नोंदणीकृत दिव्यांगाना रेनकोट, सॅनिटायझर व मास्कवाटप करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा तथा महाराष्ट्र कृषक समाज संघटनेच्या अध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी दिली.
याबाबत पत्रकात आदिक यांनी सांगितले, की माजी मंत्री गोविंदराव आदिक यांचे राज्याच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे. त्यांची जन्मभूमी श्रीरामपूर असल्याने श्रीरामपूर तालुक्यातील बहुतेक मोठी विकासकामे त्यांनी केलेली आहेत.
आदिकांनंतर त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक व नगराध्यक्ष अनुराधा आदिक हे वडिलांचा विकास कामांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. दरवर्षी स्व. आदिकांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात.
मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कार्यक्रमांना फाटा देत चौक सुशोभीकरण, दिव्यांगांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, मुख्याधिकारी गणेश शिंदे उपस्थित राहणार आहेत. सध्या कोविडमुळे अनेक निर्बंध असल्याने ठराविक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.