अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- पंजाबी युथ ऑर्गनायझेशन आयोजित पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धा नगर क्लबच्या मैदानावर उत्साहात पार पडली. अंतिम सामना वासनजीत वॉरियर्स विरुध्द खालसा वॉरियर्स संघात झाला. अत्यंत अटातटीच्या झालेल्या सामन्यात वासनजीत वॉरियर्स संघाने दणदणीत विजय मिळवला.
विजयी संघास कमल कोहली, राजू धुप्पड, विजय बक्षी, राकेश गुप्ता, जनक आहुजा, काकासेठ नय्यर, इंदरजीत नय्यर, प्रदीप पंजाबी, अहमदनगर क्लबचे सचिव राजाभाऊ अमरापूरकर, दामुसेठ बठेजा, आगेश धुप्पड यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले. विजेत्या संघाचे कर्णधार अंकित दुग्गल यांनी खेळाडूंसह चषक स्विकारले.
यावेळी स्पर्धेचे आयोजक सागर बक्षी, मोहित पंजाबी, हरजितसिंह वधवा, हितेश ओबेरॉय, गौरव नय्यर, मनयोग माखिजा, प्रेटी ओबेरॉय, बलजीत बिलरा, सावन छाब्रा, अनिश आहुजा, अभिमन्यू नय्यर, हर्ष बत्रा, नुपिंदरसिंह धुप्पड, चेतन आहुजा आदी उपस्थित होते. पंजाबी प्रीमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत 3 दिवस-रात्र क्रिकेटचे सामने सुरु होते. यामध्ये 10 संघांचा समावेश होता.
क्रेजी क्रिकेट टुर्नामेंट असल्याने खेळाचे अनेक मनोरंजनात्मक नियम व अटी पहावयास मिळाल्या. या स्पर्धेत युवकांसह महिलांनी देखील सहभाग नोंदवत खेळाचा आनंद लुटला. फटाक्यांच्या आतषबाजीत व संगीताच्या तालावर विजयी संघाने मैदानावर जल्लोष केला. मॅन ऑफ द मॅच शिवकुमार खुराणा, उत्कृष्ट फलंदाज अमरित धुप्पड, उत्कृष्ट गोलंदाज परब गुलाटी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहित भाटिया, प्लेअर ऑफ द सिरीज अंकित दुग्गल, क्रेजी प्लेअर ऑफ टुर्नामेंट आकाश चड्डा यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.
तसेच उपविजयी ठरलेल्या खालसा वॉरियर्स संघाचे कर्णधार अमृत धुप्पड यांना चषक प्रदान करण्यात आले. राकेश गुप्ता म्हणाले की, स्पर्धामय धावपळीच्या जीवनात नागरिक मैदानापासून दुरावत असून, निरोगी आरोग्यासाठी व धावपळीच्या जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी मैदानी खेळाची आवश्यकता आहे. समाज एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण व्हावी, युवकांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेली ही क्रिकेट स्पर्धा कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक सागर बक्षी यांनी केले. या स्पर्धेसाठी प्रमुख प्रायोजक राजकमल ज्वेलर्स, सह प्रायोजक युनिक डिटेलिंग मल्टी कार सर्व्हिस, साई सुर्य ट्रेडर्स यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केले. आभार हितेश ओबेरॉय यांनी मानले.
विजेता संघ वासनजीत वॉरियर्सचे मालक अनिश आहुजा, अभिमन्यू नय्यर तर उपविजेता संघाचे मालक जस्मितसिंह वधवा, डॉ.अभिषेकी वाही, सनी वधवा हे देखील यावेळी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अजय पंजाबी, राजा सबलोक, देवेंद्ररसिंह माखीजा, बिट्टू मनोचा, रितेश नय्यर, पुनित भूटानी, जी.एन.डी. ग्रुप आदींनी परिश्रम घेतले.