ताज्या बातम्या

“शहरात कोणालातरी वट बसवायचा आहे, मला कांड करायचे असते तर आधीच केले असते” ठाकरेंची तोफ धडाडण्याआधीच वसंत मोरेंचा आरोप

Published by
Ahmednagarlive24 Office

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादच्या सभेनंतर पुण्यात (Pune) भव्य सभा होणार आहे. राज ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्या आधी मनसेचे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी गंभीर आरोप केले आहेत.

वसंत मोरे यांनी फेसबुक लाइव्ह (Facebook Live) करत आरोप केले आहेत. पक्षातील पार्टटाइम लोक पक्षाची वाट लावत आहेत असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान केला आहे.

तर काल 14 मिनिटं 30 सेकंदाचं फेसबुक लाइव्ह करून त्यांनी चुकीच्या बातम्या आमच्याबाबत पसरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप वसंत मोरे (Vasant More) यांनी केला आहे.

माझ्यापेक्षा जास्त धक्का निलेश माझिरे यांना बसल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले होते. आपले सहकारी निलेश माझिरे मनसे सोडणार असल्याच्या अफवा असून यामुळे माझ्यापेक्षा जास्त धक्का निलेश माझिरे (Nilesh Mazire) यांना बसल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले होते.

1 मिलियन लाइक्स घेणारा निलेश माझिरे यांच्या पुण्यातील कामाचे मोरे यांनी कौतुक केले. निलेश माझिरे एक शहर अध्यक्ष असून त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यावर गदारोळ झाला.

कुणी या अफवा पसरवल्या हे मला माहीत नाही. पण खोट्या बातम्या पसरून निलेश माझिरेंना डावलण्यात आले असल्याचा आरोपही वसंत मोरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना मोरे म्हणाले, आजपर्यंत कोणी पक्षात बोलत नव्हते. शहरात कोणालातरी वट बसवायचा आहे. मात्र अशा कारवाया करून वट बसवण्यापेक्षा काम करून तो बसवा, असा टोला त्यांनी स्वपक्षीय नेत्यांना लगावला आहे.

पक्षात झारीतले शुक्राचार्य आहेत. राज ठाकरे यांनी विचारले तर नक्की सांगेन. पदाधिकारी हा पदाधिकारी असतो. पक्षाचा ग्रुप आहे. पक्षात मतभेद असतात. मात्र त्याचे रुपांतर मनभेदात होताना दिसत आहे, ते न होण्याचा प्रयत्न असल्याचे वसंत मोरे म्हणाले आहेत.

मागील महिनाभरापासून मला मी राजमार्गावर आहे हे सांगावे लागत आहे, हे दुर्दैव आहे. मला जाणीवपूर्वक बाजूला ठेवले जात आहे. अनेक गोष्टी राज ठाकरेंपर्यंत गेल्याच नाहीत. जे पक्षाचे पुण्यातील नेते आहेत, त्यांच्यापर्यंत मी अनेक गोष्टी घालत आहे.

कोणीतरी अशी परिस्थिती निर्माण करत आहेत. कोण पक्षातून कोणाला घालवायला बघत आहे, ते शोधावे लागेल. तर वेळ आल्यावर पक्षातील नेत्यांची नावे उघड करणार असल्याचे ते म्हणाले.

वसंत मोरे निवडणुकीपूर्वी कांड करणार असे बोलले जात आहे. मात्र मला कांड करायचे असते तर आधीच केले असते. हे सर्व पार्ट टाइम जॉबवाले करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी महाराष्ट्र सैनिकांना सांगितले आहे, अशांना फोडून काढा, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

Ahmednagarlive24 Office