Vastu tips for home : तुमची सर्व संकटे होतील दुर, फक्त अशाप्रकारे वापरा मोरपंख
वास्तुशास्त्रामध्ये मोरपिसाला एक विशेष महत्त्व आहे. मोरपिसाच्या उपायाने घरामध्ये सुख-समृध्दी नांदते. काय आहेत त्याचे फायदे वाचा.
Vastu tips for home : अनेक पुराण कथांमध्ये अशा काही वस्तूंबाबत माहिती देण्यात आली आहे ज्या देवाला तर खूप प्रिय आहेत तसेच त्या वस्तू आपल्या घरामध्ये विशेष स्थानी ठेवल्या तर आपल्याला सुख आणि समृध्दी प्राप्त करून देतात.
श्रीकृष्णाला मोरपीस इतके प्रिय आहे की ते सतत आपल्या मुकुटामध्ये मोरपीस धारण करतात. मोरपिसाचा छोटासा एक उपाय तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे करतो. घरातील काही ठिकाणी मोरपीस ठेवला तर ते लाभदायक ठरते. जर तुम्ही शनिवारी हे उपाय केले तर त्याचा फायदा होतो.
जाणून घ्या मोराच्या पिसांशी निगडित वास्तु उपाय
1. तुमच्या कुंडलीत उपस्थित ग्रह दोष दूर करण्यासाठी हातात मोरपंख घेऊन पीडित ग्रहाच्या मंत्राचा जप करा, जर तुम्ही असे केले तर तुमच्या कुंडलीत उपस्थित ग्रहांची स्थिती सामान्य होते.
2. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला भगवान श्रीकृष्णाचे चित्र किंवा मोराचा पंख लावा. जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरातील वास्तुदोष एका क्षणात दूर होतील.
3. इतकंच नाही तर तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला मोराची पिसे लावा. असे केले तर तुमच्या घरात सुख-शांती राहते आणि कोणताही वास्तुदोष जाणवत नाहीत.
4. त्याचबरोबर प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींच्या मूर्तीवरून सिंदूर घेऊन ते मोराच्या पिसावर लावून ते पाण्यात टाका. जे तुम्ही असे केले तर तुमच्या शत्रूंचा पराभव होतो.
5. घरात सुख आणि शांती टिकवून ठेवायची असेल तर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर मोराची तीन पिसे लावा, जर तुम्ही असे केले तर घरातील संकटांपासून मुक्ती मिळते. अशा प्रकारे मोराची पिसे अतिशय फायदेशीर आहे.