पैसा हा आपल्या सर्वांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा घटक असून जर तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात पैसे असतील तर तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. तुम्हाला पैशांची समस्या दूर करायची असेल तर आजच हे रोप लावा.
Vastu Tips : सध्याच्या काळातही वास्तु शास्त्राला खूप महत्त्व आहे. काही वास्तुच्या नियमांनुसार जर तुम्ही घरगुती वस्तू ठेवल्या तर तुमच्या घरात सुख आणि शांती नांदली जाते. दरम्यान वास्तुमध्ये असे काही सांगितले आहे ज्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक चणचण भासणार नाही.
जर तुम्ही तुमच्या घरात दुर्वा ठेवली किंवा दुर्वा रोप लावले तर तुम्हाला आयुष्यभर पैशांची कमतरता जाणवणार नाही. तसेच तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. परंतु हे रोप लावत असाल तर त्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा. नाहीतर याचा फटका तुम्हाला बसेल.
जाणून घ्या वास्तू नियम आणि फायदे
नेहमी दुर्वा रोप पूर्व दिशेला ठेवा. जर तुम्ही या दिशेला दुर्वा ठेवली तर तुमच्यावर श्रीगणेश प्रसन्न होतात. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही उत्तर दिशेलाही दुर्वा रोप लावू शकता.
दुर्वा जितकी हिरवी असेल तितके कुटुंबातील सदस्यांना जास्तीत जास्त आशीर्वाद मिळतात.
दुर्वाची काळजी घ्यायची असेल तर त्यात खत आणि पाणी मिसळा. जर तुम्ही दूर्वा घास लावला तर घरातील कलहही दूर होऊन कुटुंबातील प्रेम वाढते.
तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती चांगली करायची असेल तर दुर्वा ईशान्य दिशेला लावा. हे रोप मंदिरात लावण्यात येते. त्यामुळे खर्च कमी होऊन उत्पन्नाच्या मार्गात वाढ होते.
हे रोप तुमचे घरामध्ये असेल तर यामुळे सौभाग्य प्राप्त होते, तसेच तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीवर लावले तर सौभाग्यवर नकारात्मक प्रभाव पडतो.
हे रोप नेहमी मातीच्या आणि तांब्याच्या भांड्यात ठेवा. असे करणे शुभ असून आज गणेशजींना दुर्वा अर्पण केली तर गणपतीचा विशेष आशीर्वाद मिळतो.