विडी कामगार महिलांची घराबाहेर पडून निदर्शने

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- वीस दिवसापासून रोजगार नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट झाला असताना श्रमिकनगर येथे विडी कामगार महिलांनी घराबाहेर पडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाल बावटा विडी कामगार युनियनच्या (आयटक) वतीने हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे जिल्हा सचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष कॉ. भारती न्यालपेल्ली, शोभा पासकंटी, सगुना श्रीमल, संगीता कोंडा, विनायक मच्चा, रेणुका अंकारम, भाग्यलक्ष्मी गड्डम आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

लॉकडाऊन करत असताना राज्य सरकारने काही घटकांना आर्थिक मदत दिलेली आहे. यामध्ये रिक्षाचालक, बांधकाम मंजूर व इतर काही कामगार यांना पंधराशे रुपयेची आर्थिक मदत जाहीर झली आहे.

विडी कामगार हे अत्यंत गरीब व दुर्बल घटकातील असून, विडीच्या रोजंदारीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

मागील वीस दिवसांपासून विडी कारखाने बंद आहेत. राज्य सरकार किंवा कारखाने मालक यांनी विडी कामगारांना रोख स्वरूपात मदत केलेली नाही.

त्यामुळे कामगारांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. शहरात साडेचार ते पाच हजार विडी कामगार असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न बिकट बनला असताना आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.

या टाळेबंदीत आर्थिक मदत न मिळाल्यास मंगळवार दि.11 मे रोजी पत्रकार चौकात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24