अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- मुंबई-नागपूर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 700 किमी पैकी 500 किमीचे काम पुर्ण झाले आहे. नागपूर ते शिर्डी मार्ग महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे 2021 रोजी मार्ग खुला करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केली.
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प 2021 विधानसभेत सादर केला. राज्यातील रस्तेवाहतूक, रेल्वे वाहतूक संबंधी अनेक मोठ्या घोषणा त्यांनी यावेळी केल्या. ग्रामीण भागातील 40 हजार किमीची लांबीची कामे 2020 ते 2024 दरम्यान हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती.
मात्र लॉकडाऊनमुळे ती काम होऊ शकली नाहीत. त्यापैकी 10 हजार किमीची कामं यावर्षी हाती घेण्यात येणार आहेत, असे अर्थमंत्री पवार यांनी सागितलं. पुण्याबाहेरुन रिंग रोडची उभारणी काळाची गरज आहे. त्यासाठी 170 किमी आठ पदरी लांबीच्या रिंग रोडची उभारणी करण्यात येणार आहे. या रिंग रोडसाठी 26 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. रिंग रोडसाठीच्या भूसंपादनाचं काम याच वर्षी हाती घेण्यात येईल.
या रिंग रोडमुळे पुण्यातील ट्रॅफिकची समस्या सुटू शकते, असे पवार म्हणाले. नांदेड ते जालना 200 किमी लांबीच्या नव्या मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. गोव्याला जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
राज्यातील रस्त्याची नियमिती देखभाल करण्यासाठी निधी उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांअंतर्गत वित्तीय विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे.