अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- घरफोड्या वरुन विद्यमान आमदार लहू कानडे व पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याने आ.लहू कानडे यांच्या तक्रारीची दखल घेत. पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह काही कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.
देवळाली प्रवरा येथे शनिवारी राञी आठ ठिकाणी दहा ते पंधरा जणाच्या टोळक्याने घरफोड्या केल्या. सोमवारी आ.कानडे यांनी 32 गावांच्या आढावा बैठक घेतली या बैठकीत आ.कानडे व राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात शाब्दीक चकमक झाली.पोलीस निरीक्षक दुधाळ बैठक सोडुन निघून गेले.
आ.कानडे यांनी पोलीस उपअधिक्षक मिटके यांच्याकडे तक्रार केली. त्या तक्रारीची मिटके यांनी तातडीने दखल घेतली. या पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या पोलीस उप निरीक्षक मधुकर शिंदे, देवळाली प्रवरा पोलीस चौकीचे अंमलदार साहय्यक पोलीस उप निरीक्षक पोपट टिक्कल,
पो.ना. जानकीराम खेमनार,पो.काँ गणेश फाटक,पो.काँ अमोल पडोळे,पो.काँ किरण ठोंबरे आदींच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांची नवीन नियुक्ती पोलीस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ,
पोलीस चौकीचे अंमलदार पो.हे.काँ. प्रभाकर शिरसाठ, पो.ना वैभव साळवे,पो.काँ सुरेश भिसे, पो.काँ महेंद्र गुंजाळ, पो.काँ.सागर माळी, पो.काँ.शहामद शेख आदी नविन नियुक्ती करण्यात आली आहे.