प्रॉपर्टी खरेदी करताना ‘या’ 10 कागदपत्रांची पडताळणी करा, नाहीतर लाखो रुपयांचा चुना लागणार

Published by
Ahmednagarlive24 Office

Property News : आपल्यापैकी अनेकांना स्वतःचे घर घ्यायचे असेल. काही लोकांनी घर खरेदीचे स्वप्न पूर्ण केलेले असेल तर काही लोक अजूनही या स्वप्नांसाठी अहोरात्र मेहनत घेत असतील. शिवाय काही लोक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतात. दिवसेंदिवस घर जमीन व्यावसायिक मालमत्ता यांसारख्या स्थावर मालमत्तेच्या किमती वाढत असल्याने रियल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

मात्र, कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. खरंतर अनेक प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की लोक स्वस्तात प्रॉपर्टी मिळत आहे म्हणून महत्त्वाच्या कागदपत्रांची अपुरी माहिती घेऊन प्रॉपर्टीची खरेदी करतात.

अशा प्रकरणांमध्ये खरेदीदारांची फसवणूक होण्याची शक्यता असते. जर कागदपत्रे प्रॉपर नसतील तर प्रॉपर्टीच्या खरेदीत लाखो रुपयांचा चुना लागू शकतो. यामुळे कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्याआधी खरेदीदाराने काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काही कागदपत्रांची पडताळणी करून पाहिली पाहिजे, जेणेकरून त्यांच्यासोबत फसवणूक होणार नाही आणि त्यांचे कष्टाने कमावलेले पैसे सुरक्षित राहतील.

दरम्यान प्रॉपर्टी खरेदी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून मालमत्ता योग्य आणि अस्सल आहे हे कोणत्या प्रकारच्या कागदपत्रांवरून सिद्ध होते ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण याच प्रश्नाचे अगदी थोडक्यात उत्तर जाणून घेणार आहोत.

प्रॉपर्टी खरेदी करताना कोणते असे 10 कागदपत्रे आहेत जे की घर, दुकान, जमीन किंवा इतर प्रकारच्या मालमत्तेची स्थिती स्पष्ट करतात, हे थोडक्यात समजून घेणार आहोत. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी जर ही 10 कागदपत्रे तपासली, तर खरेदीदाराची फसवणूक टाळता येऊ शकते.

दरम्यान जाणकार लोकांनी, प्रॉपर्टी खरेदी करू इच्छिणाऱ्यांना सर्वप्रथम मालमत्ता खरेदी करण्याआधी एका गोष्टीची काळजी घेण्यास सांगितले आहे. तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, जर तुम्ही कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्ही रेरा नोंदणी आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे तपासून पहा.

कोणत्या कागदपत्रांची तपासणी करावी :- प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने जी मालमत्ता, घर इत्यादी खरेदी करायचे आहे त्याची मूळ कागदपत्रे तपासली पाहिजेत. कारण की मूळ कागदपत्रांवरूनच प्रॉपर्टीची स्थिती समजू शकते. मूळ कागदपत्रे नसतील तर संबंधित विकासकाला किंवा खाजगी व्यक्तीला मूळ कागदपत्रे सादर करण्यास सांगा. मूळ कागदपत्रे न पाहता ॲडव्हान्स देऊ नये. तसेच कोणताच करार करू नये.

विक्री करार
टायटल डिड
अप्रूव्ड बिल्डिंग प्लान
पूर्णत्व प्रमाणपत्र (नव्याने बांधलेल्या मालमत्तेसाठी)
प्रारंभ प्रमाणपत्र (निर्माणाधीन मालमत्तेसाठी)
रूपांतरण प्रमाणपत्र म्हणजे अकृषी प्रमाणपत्र (शेती जमीन अकृषीमध्ये रूपांतरित केली असल्यास)
खाते प्रमाणपत्र
बोजा प्रमाणपत्र
नवीनतम कर पावत्या
भोगवटा प्रमाणपत्र
वर दिलेली दहा कागदपत्रे प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक पडताळून पाहणे गरजेचे आहे. वरीलपैकी कोणत्याही एका कागदपत्रात जर तुम्हाला काही शंका असेल तर तज्ञ लोकांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Ahmednagarlive24 Office