अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! शहरातील ह्या मुख्य वाहतुक मार्गात होतोय बदल…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- शहरातील सक्कर चौक ते जीपीओ चौक या दरम्यान उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असुन त्या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिकेकडुन कोठी चौक या ठिकाणी पाण्याचे पाईपलाईनचे काम करावयाचे प्रस्तावित झालेले आहे.

सदर काम दोन टप्यांमध्ये पुर्ण करण्यात येणार असल्याने त्या कालावधीत वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पहिल्या टप्प्यात (दिनांक 20 जून ते 21 जून 2021 या कालावधीत) अहमदनगर कडून पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक कोठी चौक येथून – मार्केटयार्ड भाजी मार्केट – महात्मा फुले चौक- सक्कर चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.

तसेच दुस-या टप्याकरीता पुणेकडून अहमदनगरकडे येणारी सर्व प्रकारची वाहतुक दिनांक 22 जून ते 28 जून 2021 या कालावधीत सक्कर चौक येथून टिळकरोड- आयुवेंदिक कॉलेज कॉर्नर- नेप्ती नाका- दिल्ली गेट- अप्पु हत्ती चौक-पत्रकार चौक – एसपीओ चौक मार्गे वळविण्यात येणार आहे.

दिनांक 22 जून ते 28 जून 2021 या कालावधीत हातमपुरा ते कोठी चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडील अधिसुचनेप्रमाणे अहमदनगर शहरातील बाजारपेठेत माल खाली करणारे अवजड वाहनांना चांदणी चौक ते सक्कर चौक दरम्यान प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सर्व वाहने (एस.टी.बसेस) एसपीओ चौक- पत्रकार चौक- दिल्ली गेटे- नेप्तीनाका – टिळकरोड-सक्कर चौक या मार्गाचा वापर करतील. एसटी बसेस यांना मार्केट यार्ड चौक ते चांदणी चौक दरम्यान प्रवेश बंदी करण्यात येणार असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत कोणाच्या काही हरकती असल्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखा, अहमदनगर येथे समक्ष येवून किंवा ईमेल pi.tfccity.anr@mahapolice.gov.in वर दिनांक 17 जून 2021 रोजीपर्यंत द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24