अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाची बातमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- समाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाँडेशन अहमदनगर संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, विळद घाट व समाज कल्याण विभाग,

जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता एडीआयपी योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव, साहित्य साधने व उपकरणांचे उदा.

तीन चाकी सायकल, व्हील चेअर, ब्रेल घड्याळ ब्रेल पाटी, सरेब्रल पाल्सी खुर्ची, एम.आर.कीट, वॉकर, कुबड्या, अंध काठी (इलेक्ट्रॉनिक), कृत्रिम हात-पाय व पट्टे, श्रवणयंत्र इ. वाटप करण्यात येणार आहे. सदर योजनेसाठी दिव्यांग व्यक्तींनी तीन पासपोर्ट साईज फोटो,

आधारकार्ड, दिव्यांगत्व प्रमाणपत्र, तहसीलदार यांचेकडील चालु आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला व रेशन कार्ड आवश्यक आहे. अहमदनगर जिल्हयातील 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व प्रमाणपत्र धारक दिव्यांग व्यक्तींनी सदर योजनेचा लाभ घेणेसाठी www.ddrcnagar.in या संकेतस्थळावरुन नोंदणी करता येईल.

तसेच जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र वडगाव गुप्ता (विळद घाट) अहमदनगर येथे समक्ष उपस्थित राहुन आवश्यक कागदपत्रे सादर करुन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच अधिक माहितीसाठी 9022147060 प्रविण कांबळे यांचेशी संपर्क साधावा.

डॉ. अभिजित दिवटे, संचालक जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, विळदघाट, अहमदनगर, राधाकिसन देवढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर,

वैद्यकिय समन्वयक डॉ. दिपक अनाप व जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे प्रशासकीय समन्वयक डॉ. अभिजित मेरेकर यांनी अहमदनगर जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना सदर योजनेचा लाभ घेणेबाबत ऑन लाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.