अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- शिर्डीत जाणाऱ्या भाविकांना आता टोल देऊन श्रीसाईबाबांच्या दर्शन घेता येणार आहे. तसा ठराव शिर्डी नगरपंचायतीने केला आहे.
नगरपंचायतीच्या या निर्णयावर भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शिर्डीत येणाऱ्या भाविकांकडून आता प्रवेश कर घेण्याच्या नगरपंचायतीच्या निर्णयावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीही आक्रमक झाले आहेत.
साईबाबा संस्थान शहर स्वच्छतेसाठी दरमहा नगरपंचायतीला 42 लाखांचा निधी देत होते. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळात संस्थानने स्वच्छता निधी बंद केला.
साईबाबा संस्थानकडून स्वच्छता निधी बंद झाल्यामुळे शिर्डी नगरपंचायतीने आता भाविकांकडून टोल वसुलीचा मार्ग अवलंबल्याचे बोलले जात आहे. शिर्डी शहर स्वच्छतेसाठी भाविकांकडून प्रवेश कर आकारणी केली जाणार आहे.
शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे येणाऱ्या भाविकांची तपासणी करणे आणि लक्षणे आढळल्यास उपचार करण्याच्या सूचना प्रांतधिकारी म्हस्के यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत दिल्या.
शिर्डीत साई बाबांच्या दर्शनाला दररोज होणारी गर्दी, गावोगावचे आठवडे बाजार, बाजारपेठ, दुकानं, लग्न, सभा, मेळावे, अंत्यविधी अशा सगळ्याच ठिकाणी नागरिक निर्धास्तपणे फिरत आहेत.
त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याचा अनेकांना विसर पडल्याचे चित्र दिसत असल्याने सर्व विभागांना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.