ताज्या बातम्या

अत्यंत महत्वाची बातमी ! नाताळसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :-  देशात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत असल्याने धोका वाढू लागला आहे. असे असले तरी लोक नवीन व्हेरिएंटबाबत गंभीर नाहीत.(Christmas news)

त्यामुळे दोन दिवसांत येणार नाताळ सण देखील साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.

अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळावर देखील ओमायक्रॉनचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर नाताळसाठी शास्नानाकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

नेमकी काय आहे नवीन नियमावलीमध्ये? जाणून घ्या…

ख्रिश्चन बांधवांनी या वर्षी देखील नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने करावा.

चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक.

फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये.

चर्चच्या बाहेर परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नये.

कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि मिरवणूकीचे आयोजन करु नये.

कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी.

स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये ५०% लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी जास्त जणांचा समावेश नसावा.

सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासोबतच चर्च परिसराचं नियमितपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणं अनिवार्य

दरम्यान, महापालिकेमार्फत २४ विभागस्तरांवर प्रत्येकी दोन पथके तयार करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार प्रत्येकी दोन पथके वाढविण्याची तयारी पालिकेने ठेवली आहे. ही पथके त्या त्या विभागांतील हॉटेल, बंदिस्त सभागृह, मोकळ्या जागेतील कार्यक्रम यावर लक्ष ठेवून असणार आहे.

Ahmednagarlive24 Office