Vi Rechrge Offer : Vi देत आहे मोफत डेटा, मात्र असणार असणार ‘ही’ अट

Vi Rechrge Offer : इतर टेलिकॉम कंपन्याप्रमाणे Vodafone Idea चे वापरकर्ते खूप आहेत. ही कंपनी ग्राहकांचा आर्थिक भार लक्षात घेता त्यांना परवडणारे प्लॅन लाँच करत असते.

सर्वात म्हणजे फक्त Vodafone Idea ही कंपनी वीकेंड डेटा रोलओव्हर करते. त्यामुळे ग्राहकांना आता रात्रभर मोफत अनलिमिटेड इंटरनेट वापरता येते. परंतु, हा डेटा तुम्हाला रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत वापरावा लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Vi Hero Unlimited सेवेसह, कंपनी आपल्या सर्व वापरकर्त्यांना रात्रभर मोफत अनलिमिटेड इंटरनेट देत आहे. त्यासोबतच हा डेटा दैनिक मर्यादेत समाविष्ट केलेला नाही. म्हणजेच या कालावधीत इंटरनेट वापरताना दैनंदिन डेटा मर्यादा संपणार नाही. त्यामुळे तुम्ही बिनधास्त डेटा वापरू शकता.

काय आहे ऑफर

Vi Hero अनलिमिटेड सुविधेचा लाभ सर्व प्रीपेड प्लॅन्सवर 299 रुपये आणि त्यावरील प्लॅनवर उपलब्ध आहे. तुम्ही आता 299 रुपयांवरील कोणत्याही प्लॅनमधून रिचार्ज केला तर वापरकर्त्यांना मोफत 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अमर्यादित डेटा मिळतो.

करू शकता या प्लॅनसह रिचार्ज

जर तुम्ही 299 रुपये ते 3,099 रुपयांपर्यंतचा रिचार्ज केला तर या ऑफरचा लाभ घेता येतो. तुमच्या प्लॅनची ​​वैधता आणि दैनंदिन डेटा लिमिट काहीही असो, या ऑफरचा लाभ तुम्हाला घेता येतो.

वीकेंड डेटा रोलओव्हर

Vi ही प्रीपेड प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर सुविधा देणारी एकमेव कंपनी असून तुम्ही तुमचा दैनंदिन डेटा सोमवार ते शुक्रवारदरम्यान वाचवला असेल तर तो डेटा वीकेंडला म्हणजे शनिवार आणि रविवारी वापरता येतो.