FIFA World Cup 2022 : ग्राहकांसाठी Vi ने लाँच केले 4 जबरदस्त प्लॅन, ‘या’ सुविधाही मिळत आहेत फ्री

FIFA World Cup 2022 : कतारमध्ये फुटबॉलचा थरार सुरु आहे. अनेकजण कतारमध्ये फुटबॉलचा आनंद घेण्यासाठी तेथे गेले आहेत. मात्र अनेकांना जात आले नाही.

त्यांच्यासाठी आता जिओ पाठोपाठ Vodafone Idea ने आपल्या ग्राहकांसाठी 4 जबरदस्त प्लॅन लाँच केले आहेत. त्यासोबत कंपनी काही विशेष सुविधाही अगदी मोफत देत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आपल्या ग्राहकांसाठी Vi ने चार नवीन पालन प्लॅन लाँच केले आहेत. विशेष म्हणजे हे प्लॅन आंतरराष्ट्रीय रोमिंग आहेत या प्लॅनमुळे ग्राहकांना परदेशात कॉलिंग आणि मोबाईल डेटा वापरता येईल.

1. 2,999 रुपयांचा रोमिंग प्लॅन

Vi आपल्या ग्राहकांसाठी 2,999 रुपयांचा रोमिंग प्लॅन देत आहे, या प्लॅनची वैधता फक्त 7 दिवसांसाठी असेल. यामध्ये ग्राहकांना 2GB डेटा, स्थानिक आणि भारतीय नंबरवर 200 मिनिटे आउटगोइंग कॉल करता येतो. त्याचबरोबर यामध्ये इतर देशांना आउटगोइंग कॉल्स 35 रुपये प्रति मिनिट आणि 25 एसएमएसही उपलब्ध आहेत.

2. 3,999 रुपयांचा रोमिंग प्लॅन

दुसरा प्लॅन हा 3,999 रुपयांचा असून याची वैधता 10 दिवसांची आहे. हा प्लॅन 3GB डेटासह येतो. त्याचबरोबर ग्राहकांना 25 रुपये प्रति मिनिट या दराने 300 मिनिटे लोकल आणि भारत आउटगोइंग आणि इतर देशांना आउटगोइंग कॉल चा लाभ घेता येतो. इतर फायद्यांबद्दल सांगायचे झाल्यास विनामूल्य इनकमिंग कॉल आणि 50 एसएमएसचा समावेश आहे.

3. 4499 रुपयांचा रोमिंग प्लॅन

तिसरा प्लॅन हा 4,499 रुपयांचा आहे या प्लॅनमध्ये 5GB डेटा, 500 मिनिटांचा लोकल आणि भारत टॉकटाइम आणि 14 दिवसांसाठी 100 एसएमएसचा येतो. या प्लॅनमध्ये इतर देशांना 35 रुपये प्रति मिनिट दराने आउटगोइंग कॉल्स आणि मोफत इनकमिंगची सुविधा मिळते.

4. 5999 रुपयांचा रोमिंग प्लॅन

चौथा आणि शेवटचा 5,999 रुपयांचा प्लॅन आहे यामध्ये 5GB मोबाइल डेटा, 500 मिनिटे लोकल आणि भारत आउटगोइंग कॉल येतात. त्याचबरोबर 35 रुपये प्रति मिनिट इतर देशांना आउटगोइंग तसेच 100 एसएमएस आणि मोफत इनकमिंगची सुविधा मिळते.