शिक्षण क्षेत्रात वायरल होतोय व्हिडिओ, काय आहे सत्य.

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच ऑफलाइन शिक्षण सुरू झाले. विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगला लागला तर त्याचे फलक तयार करुन कॉलेज आवारात लावले जातात.

अटेंडस नसले किव्हा बंक करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादीही बोर्डावर लावली जाते. या कॉलेजने लेक्चर कमी घेणाऱ्या प्राध्यापकांच्या यादीचा फलक कॉलेजच्या आवारात लावला आहे.

हा फलक सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. कल्याण पश्चिमेला असणाऱ्या के. एम. अग्रवाल या नामांकित कॉलेजमध्ये एक भन्नाट घटना घडली आहे.

ज्युनिअर कॉलेजच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या सहा प्राध्यापकांच्या नावाची यादीच कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ लावली आहे. या प्राध्यापकांनी जुलै ते नोव्हेंबर दरम्यान कमी लेक्चर घेतले आहे.

हा फलकच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. कोरोनाकाळात कॉलेज बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण मात्र सुरूच होते.

या कॉलेजमध्ये जुनिअर आणि पदवीचे विविध शाखेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 6500 तर इतकी आहे. या कॉलेजमध्ये जुनिअर आणि सिनिअरला मिळून 125 प्राध्यापक विद्यादानाचे काम करीत आहे. त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या 100  आहे.

प्राचार्या अनिता मन्ना यांनी सांगितले की, हा आमच्या कॉलेजच्या अंतर्गत विषय आहे. संबंधित प्राध्यापकांकडून कमी लेक्चर का घेतले याचा खुलासा मागविला आहे.

Ahmednagarlive24 Office