अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी आरोप असलेले विजय मकासरे यांचा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे.
शुक्रवार ६ ऑगस्ट रोजी वाघाचा आखाडा रस्त्यालगत हॉटेलजवळ दुचाकी गाडी अडवून विजय मकासरे व त्यांच्या साथीदाराने डोक्याला कट्टा लावत २५ हजार रूपयाची रोकड व सोन्याची अंगठी लंपास करत जीवे मारण्याची धमकी तसेच अट्रोसिटी व विनयभंगाचे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची फिर्याद देवेंद्र लांबे यांनी दिली,
म्हणून मकासरे यांच्याविरूद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी विजय मकासरे यांनी जिल्हा सत्रन्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवा म्हणून अर्ज केला होता.
तो नामंजूर करण्यात आला आहे. विजय मकासरे यांच्या वतीने विधीज्ञ पालवे यांनी युक्तिवाद केला. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. कापसे यांनी व तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांनी बाजू मांडली. लांबे यांच्या वतीने अॅड. वैभव पवार यांनी सरकारी वकिलांना मदत केली.