अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ते भूमिका स्पष्ट करतीलच प्रदेशाध्यक्षांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
परंतु त्यावरुन जे सूडाचे राजकारण चालू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे असे मत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा यांनी व्यक्त केले. जि प सदस्य शरद नवले यांच्या वस्तीवर स्नेह मेळावा व कार्यकर्त्यांशी हितगुज कार्यक्रमासाठी ते आले असता
पत्रकारांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया घेतली असता माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा म्हणाले की राज्यातील शासन सूडाचे राजकारण करत आहे त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमताच नाही.
शैक्षणिक मुद्दा : आँनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिक्षण मंत्री महोदयांना राज्यातील सर्व मुलांना मोफत टँब देण्याची सूचना केली होती
अनेक मुलाकंडे छोटे छोटे मोबाईल असल्यामुळे त्यांना निट समजत नाही मोबाईलला रेंजच नसते शाळा केव्हा सुरु होईल याचाही साधा निर्णय घेता आलेला नाही सर्व परीक्षेत हे सरकार नापास झाले आहे कुणालाच मदत करण्याची या सरकारची तयारी नाही.
लसीकरण मुद्दा : कोवीडमुळे अनेक स्थित्यंतरे आली कोरोना लसीकरणाबाबत राज्याच केंद्रा विरोधात वातावरण तयार करण्यात आले होते.
परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारतात मोफत लस देण्याची घोषणा करुन लसीकरण सुरुही केले आहे. गोरगरीबांना कोरोना काळात मोफत धान्य दिले आता
तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात उतरले पाहीजे राजकारणाच्या पलीकडे जावुन तरुणाकरीचा रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहीजे, असे विखे म्हणाले.