व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येबाबत विखे पाटील म्हणाले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्येवरून भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर सोमवारी टिकेची झोड उठविली आहे.

विखे यांनी या घटनेवर गृहमंत्र्यांना तातडीने निवेदन सादर करण्याची मागणी केली.विखे यांनी गृहखात्याचे सरकारवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही.

पोलीस सामान्यांवर धाक दाखवत आहेत. मात्र गुंड मोकाट राहिल्याचे ते म्हणाले. हिरण यांचे अपहरण झाल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासनाला व्यापा-यांनी सर्व माहिती दिली होती.

जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याबाबत गांभीर्य दाखविले गेले नाही. हिरण यांचे वडील स्वातंत्र्यसेनानी होते. त्यामुळे अशा कुटुंबातील व्यक्तीची हत्या खेदनजनक आहे.

या प्रकरणाचा तातडीने छडा लावावा. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर निवेदन सादर करावे, अशी मागणी अशी विखे यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24