विखे पाटील म्हणाले…‘पक्ष काढण्याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी संभाजीराजेंचा व्यक्तिगत आहे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- मराठा आरक्षण या मुद्द्यावर बोलताना खासदार संभाजीराजे यांनी नवीन पक्ष काढण्यासंबंधी सूतोवाच केले आहेत.

त्यावर बोलताना ज्येष्ठ भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठ्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले, ‘आरक्षणाच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांनी मांडलेली भूमिका ही मराठा समाजाच्या हिताचीच आहे

पण सरकारला केवळ अल्टिमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेवून भूमिका मांडण्याची गरज आहे. मराठा आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी समाजातील सर्व संघटनांना एकत्रितपणे दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही.

‘ छत्रपती संभाजी महाराजांनी नवीन पक्ष काढण्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘पक्ष काढण्याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी त्यांचा व्यक्तिगत आहे. मात्र मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका उभी केलेली नाही.

आरक्षणाच्या प्रश्नासाठी सर्वांना एकत्रित भूमिका घेवूनच पुढे जावे लागेल. मराठा आरक्षण देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे.

केवळ अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविण्यात आघाडी सरकार वेळ वाया घालवत आहे. सरकारमधील मंत्र्यांची वेगवेगळी वक्त‍व्ये पाहिल्यास आरक्षणाच्या संदर्भात आघाडी सरकारचा हेतु प्रामाणिक दिसत नाही.’

अहमदनगर लाईव्ह 24