विखे म्हणाले…सरकार कोव्हीडचे कारण करत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात घालतायत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-कोव्हीडच्या कारणाने यापुर्वीच सलग पाचवेळा या परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलण्याचा निर्णय केला होता.

परंतु या सरकारकडे संवेदनशीलता नसल्याने फक्त कोव्हीडचे कारण पुढे करत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात घालण्याचे पाप राज्य सरकार करीत असल्याची टिका भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

सरकारने अचानक परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय करून विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण केल्याबद्दल विखे पाटील यांनी सरकारचा निर्णय हा अतिशय विश्वासघातकी असल्याचे सांगितले.

राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी देखील विखे पाटील यांनी केली. सरकारच्या निर्णयाची विद्यार्थाना बसतेय मोठी आर्थिक झळ MPSC च्या या परीक्षेच्या तयारीकरिता बहुतांशी ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात जावून राहत आहेत. यासाठी त्यांना खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

सलग पाचवेळा परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आता हवालदिल झाले आहेत. त्यातच या परीक्षेसाठी वयाची अट असल्याने परीक्षा लांबणीवर गेल्यास वयोमर्यादेच्या अटीमुळे विद्यार्थांना भविष्यात या परीक्षेस बसणेही अडचणीचे ठरेल, याचे भान राज्य सरकारने ठेवायला हवे होते.

दरम्यान परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा सरकारने फेरविचार न केल्यास केल्यास राज्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार राहील, असा इशारा आ. विखे यांनी दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24