वाळू तस्करीच्या मुद्द्यावरून विखेंची महसूलमंत्र्यांवर जोरदार टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. यातून गावपुढारी तयार करण्याचे काम सर्व तालुक्यांत सुरू असून महसूलमंत्री वाळू माफियांवर काही बोलत नाही.

वाळू वाहणाऱ्या तस्करांना पोसण्याचे काम सध्या सुरु आहे, असा थेट आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.

श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या 59 व्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेत आ. विखे पाटील बोलत होते. पुढे बोलताना विखे म्हणाले कि, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यामुळे अकोले तालुक्यातील निळवंडेच्या बंद पडलेल्या कालव्यांना चालना मिळाली.

निळवंडेचे पाणी गणेश परिसरात आले तर हा परिसर सुजलाम् सुफलाम् होईल. राज्यात माफिया राज सुरू आहे. जिल्ह्यात वाळूने उच्छाद मांडला आहे. महसूलमंत्री वाळू माफियांवर का बोलत नाही. वाळू वाहणारे त्यांचेच बगलबच्चे आहेत.

कोपरगाव, संगमनेरला हेच सुरू आहे. वाळूवर माफिया पोसवायचे आणि माफियांनी गावपुढारी, गुन्हेगारी पोसवायची! हे काम सुरू असल्याची टीका आ. विखे पाटील यांनी केली.

दरम्यान निळवंडेच्या कामांना चालना मिळाल्याबद्दल माजी मंत्री राधाकृष्ण विखे, मधुकरराव पिचड यांच्या अभिनंदनाचा ठरावही सभेत करण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24