मराठा आरक्षणा संदर्भात जिल्ह्यात गाव बंद आंदोलन करणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- संपूर्ण देशातील नागरिकांचे लक्ष लागून असललेल न्यायालयीन प्रकरण मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.

मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला. आता यावरून ठिकठिकाणहून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

राज्य सरकारने योग्य भूमिकांना मांडल्यामुळे आरक्षण रद्द झाल्याचा निषेध करत मराठा महासंघातर्फे 9 मे पासून नगर जिल्ह्यातून आंदोलनाला सुरुवात केली जात आहे.

त्यासाठी आठ मे रोजी नगर येथे मराठा क्रांती मोर्चा, मराठा महासंघ, शेतकरी मराठा महासंघाच्या समन्वयकाची बैठक आयोजित केली असल्याची माहिती शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे पाटील यांनी दिली.

मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार नेमकं काय करणार? राज्य सरकार नेमकी काय भूमिका काय असेल.

हे शासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी करत मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निषेध करत नऊ मेपासून मराठा महासंघ शेतकरी मराठा महासंघ मराठा समितीतर्फे गाव बंद आंदोलन करण्यात येणार आहे.

पुढील रणनीती ठरविण्यासाठी 8 मे रोजी नगर येथील शासकीय विश्रामगृहावर सर्व पदाधिकारी समन्वयक्कांची बैठक होणार होणार आहे.त्यासाठी पदाधिकारी समन्वयकांनी बैठकीला हजर राहावे असे आवाहन संभाजी दहातोंडे यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्वि
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24