अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी अखेर गावोगावी लसीकरणाला सुरुवात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- नगर तालुक्यातील कोरोनाचे लसीकरण ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रापुरते मर्यादित न राहता गावोगावी लसीकरण करण्यात यावे.

अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी नगर तालुका तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे केलेली होती, सदर मागणी मान्य करत प्रशासनाच्या वतीने नगर तालुक्यात गावोगावी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

यावेळी कोकाटे म्हणाले की, कोरोनाचे लसीकरण फक्त ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होत असताना, तालुक्यातील जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

५०-१०० लस उपलब्ध असताना लस घेण्यासाठी ३००-४०० जेष्ठ नागरिक उपस्थित राहतात आणि लसीकरणापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना रोज चकरा माराव्या लागत होत्या. लसीकरणाच्या ठिकाणी काही नेतेमंडळी प्रशासनावर दबाव आणून आपल्या मर्जीतील लोकांचे लसीकरण करून घेत होते.

त्यामुळे हे अनेक गोरगरीब ग्रामस्थ लसीकरणापासुन वंचित राहत होते.त्यामुळेच गावोगावी लसीकरण आयोजित करून ग्रामस्थांची गैरसोय टाळावी, अशी मागणी दशमीगव्हाणचे सरपंच बाबासाहेब काळे, मदडगावचे सरपंच अनिल शेडाळे,

मांडवे गावचे सरपंच सुभाष निमसे, सारोळा बद्धीचे सरपंच सचिन लांडगे, नारायणडोह गावचे सरपंच किशोर गायकवाड, कोल्हेवाडीचे सरपंच पोपट शेळके यांच्यासह तालुक्यातील अनेक गावचे सरपंच व ग्रामस्थांची होती.

त्याच मागणीचा विचार करत तहसीलदार यांना नगर तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने मागणी केलेली होती. सदर मागणी मान्य करत प्रशासनाच्या वतीने अखेर गावोगावी लसीकरण सुरू केले आहे.

सदर मागणीवर ताबडतोब विचार करत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24