अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-नागापूर येथे अनेक दिवसापासून कोरोनाबाधीत रुग्णाचे अंतविधी सुरु आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
काही नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होत असल्यामुळे कोरोना रूग्णांवर चालू असलेले अंत्यविधी ताबडतोब थांबवा.
असे निवेदन मनपाचे उपायुक्त राऊत यांना दिले आहे. नागापूर अमरधाम स्मशानभूमी ही खाजगी मालकीच्या जागेवर आहे.
सदरची स्मशानभूमी ही अहमदनगर महानगर पालिकेने ताब्यात द्यावी, स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे, तेथे सर्व सुविधा उपलब्ध कराव्या नंतरच येथे अंत्यविधी करावेत.
नागापूर येथे असणाऱ्या अमरधामची अवस्था अतिशय वाईट आहे. जाण्यासाठी रस्ता नाही. कुठलीही व्यवस्था येथे नसल्याने अंत्यविधीसाठी अनेक अडचणी येतात .
ही स्मशानभूमी अहमदनगर महानगरपालिकेने या स्मशानभूमीची दुरुस्ती,देखभाल,सुशोभीकरण करावी.
त्यानंतर या ठिकाणी कोरोना बाधितांचा अंत्यविधी करावा, असे दत्ता सप्रे यांनी यावेळी आयुक्तांना सांगीतले.