प्रशासकीय नियमांचा भंग ! बेलापूरात पाच दुकाने सिल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- बेलापूर मधील पाच दुकाने प्रशासनाने सील केली आहेत. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने हि आक्रमक कारवाई केली आहे. या आक्रमक कारवाईमुळे दुकानदार चांगलेच धास्तावले आहे.

प्रशासनाच्या या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. कोरोना परिस्थितीत व्यापारी वर्ग हा मेटाकुटीस आलेला असताना आता प्रशासनाने ही कठोर कारवाई केल्यामुळे आता प्रपंच कसे चालवावे असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.

मा. जिल्हाधिकारी यांनी दुकान उघडे ठेवण्यासाठी दुपारी चारची वेळ दिलेली असतानाही अनेक दुकानदार दुकानाचा एक दरवाजा एक फळी उघडी ठेवुन व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे व कोरोना रुग्णांची संख्या वाढु लागल्यामुळे जिल्हाधिकारी यानी कडक निर्बंध घालून दिले आहेत

ठरवुन दिलेल्या वेळेनंतर दुकान उघडे असल्यास दुकाने सिल करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बेलापूर येथील चिकन शाँप हे दुपारी चार नंतरही सुरु असल्याचे व वारवार सांगुनहीचार नंतर दुकान सुरुच ठेवल्यामुळे

लकी चिकन सेंटर गुडलक चिकन सेंटरडेली फ्रेश चिकन सेंटर ए नव चिकन शाँप सुपर चिकन शाँप ही दुकाने शासनाने ठरवुन दिलेल्या वेळे व्यतिरीक्त उघडी ठेवुन नियामाचा भंग केला जात असल्याचा अहवाल पोलीसांनी तहासील कार्यालय श्रीरामपुर येथे पाठविला होता.

तहसीलदार प्रशांत पाटील यांनी ही दुकाने तातडीने सिल करण्याचे आदेश मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी यांना दिले. त्या नंतर आज दुपारी मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी कामगार तलाठी कैलास खाडे यांनी बेलापुर पोलीसांना सोबत घेवुन हे पाचही दुकाने सिल केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24