अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-दिवसेंदिवस देश व राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत.
त्यानुसार धार्मिकस्थळी व सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
याबाबतचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. सोमवारपासूनच याची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.
धार्मिक ठिकाणी अथवा सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, धुम्रपान न करणे, परिसरात न थुंकणे या नियमांचे उल्लंघन करणारास १०० रुपये इतका दंड होता.
मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने धार्मिक स्थळांच्या ठिकाणी नियमांचे पालन करण्याबाबत जिल्हाधिका-यांनी यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. सदरचे अधिकार पोलीस नाईक ते पोलीस अंमलदार यांना देण्यात आले आहेत.