प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन पडले महागात..! दोन दिवसांत तब्बल १०९ जणांवर गुन्हे दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-   जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध लादलेले आहेत. मात्र या नियांचे अनेकजण सर्रापणे उल्लंघन करत आहेत. या काळात दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी विविध पथके नेमलेली आहेत.

या पथकांनी अवघ्या दोन दिवसांत तब्बल १०९ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. नगर जिल्ह्यात शनिवार व रविवारचा विकेंड लॉकडाऊन वगळता सर्व दुकाने व अस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

मात्र शनिवार व रविवारीही तालुक्यातील अनेक गावात दुकाने सुरू ठेवत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आयेजित केले जात असून यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली जाते.

यादरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवले जातात त्याअनुषंगाने सानप यांनी मंगल कार्यालय चालक व मालकांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करावे. अन्यथा दंडात्मक कारवाईसह मंगल कार्यालये सील करण्याची देखील कारवाई करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

अहमदनगर लाईव्ह 24