नियमांचे उल्लंघन ! कापड दुकानांसह 04 दारु दुकानांवर प्रशासनाची कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :-  करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक निर्बंध घातले आहे. मात्र तरीही काहींकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

याच अनुषंगाने नियमांचे उल्लंघन करत सुरु असलेल्या 02 कापड दुकानांसह 04 दारु दुकानांवर स्थानिक प्रशासनाने कायदेशिर कारवाई केली आहे.

दरम्यान हि कारवाई संगमनेर मध्ये करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये संदीप विष्णु वर्पे यांचे मन मार्केट क्लॉथ स्टोअर्स व बाळासाहेब मुटकुळे यांचे साई शॉपी क्लॉथ स्टोअर्स ही दोन कापडाची दुकाने सुरु असलेली आढळून आली.

तसेच तालुका हद्दीत कोल्हेवाडी, तळेगाव, नान्नजदुमाला या गावांमध्ये चार बेकायदेशिररित्या दारु विक्रेत्यांवर पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व कर्मचार्‍यांनी छापा टाकून कारवाई केली आहे.

दारु विक्रेत्यांकडून 10 हजार 638 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने एकूण सहा दुकानांवर दंडात्मक कारवाई केली तसेच गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24