नवऱ्यासोबतच्या लफड्याच्या संशयावरून महिलांमध्ये जुंपली हाणामारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- पती , पत्नी और वो… असे अनेक किस्से आजवर तुम्ही ऐकले असतील. प्रकरण गुपचूप तोपर्यंत सगळं काही ठीक मात्र याची चाहूल

आपल्या पत्नीला लागली कि तिथून पुढे कौटुंबिक कलह सुरु होऊन यातून वाद होणारच हे निश्चित असते. असाच एक प्रकार नगर शहरात घडला आहे.

नगर- कल्याण रोडवरील सिना नदीच्या पुलाजवळ पती सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत एका महिलेने दुसर्‍या महिलेला मारहाण केली.मारहाण झालेल्या महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी शनिवारी रात्री नगर- कल्याण रोडवरून त्यांच्या आईच्या घरी जात होत्या.

सिना नदीच्या पुलाजवळ समोर आलेल्या एका महिलेने फिर्यादी यांना पती सोबत असलेल्या प्रेम संबंधावरून शिवीगाळ, दमदाटी करून हातातील वस्तूने मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश चौधरी करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24