Viral News : जगात असे अनेक देश आहेत त्यांचे कायदे (Laws) आणि प्रथा या इत्तर देशांपेक्षा वेगळ्या असतात. देशातील कायदे म्हंटल की त्या कायद्यानुसारच वागावे लागते. असे म्हंटले जाते की कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. असा एक अजब देश आहे जिथे रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ (Bath) करावी लागते नाहीतर त्याची रवानगी थेट जेलमध्ये होते.
बर्याच देशात अनेकदा तिथल्या सरकारच्या म्हणण्यानुसार आयुष्य व्यतीत करावे लागते.पण काही देश असे आहेत की ज्यांचे कायदे आणि नियम कोणाला हसायला लावतात. अनेक वेळा सरकारने केलेल्या अजब कायद्यामुळे सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
नुकतेच भारतात (India) गुजरातच्या (Gujrat) माफी बिंदुने (Mafi Bindu) स्वतःशीच लग्न केले आहे. या वृत्ताने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून अनेकजण संतापलेले दिसत आहेत. या प्रकरणादरम्यान सोलोगॅमीचा मुद्दा ऐरणीवर आला होता.
भारतीय कायद्यात स्व-विवाहाला परवानगी आहे की नाही यावर वाद सुरू झाला. त्यानंतर हे कळले की स्व-विवाहाला भारतात मान्यता दिली जाणार नाही. कायद्याच्या नजरेतही अशा विवाहाचा विचार केला जाणार नाही. भारताशिवाय जगात असे काही देश आहेत ज्यांचे नियम आणि कायदे खूपच विचित्र आहेत.
जगात असे विचित्र कायदे आहेत
इंग्लंडमधील (England) मॅसॅच्युसेट्समध्ये एक विचित्र कायदा चालवला जातो. येथे अंघोळ न करता झोपणे बेकायदेशीर मानले जाते. असे केल्यास तुरुंगात जावे लागेल.
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जर कोणी अंडरवेअर घालून कार साफ करण्यास सुरुवात केली तर त्याला शिक्षा म्हणून दंड भरावा लागू शकतो.
स्वित्झर्लंडमध्ये जर कोणी रात्री १०:०० नंतर बाथरूम फ्लश केले. किंवा बाथरूममधून आवाज आला तर दंड होतो.
मिलान, इटलीमध्ये हसताना कोणीही पकडले तर दंड आकारला जातो.