अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- मोठमोठे सेलिब्रेटी आणि त्यांची उत्पन्नाची वेगवेगळे असलेली स्रोत जाणून घेण्यात नेहमीच अनेकांना रुची असते.
हे मोठे कलाकार मोठमोठी मानधन घेतात त्याचबरोबर त्यांची इतरही उत्पन्न स्रोत असतात. ज्याच्या माध्यमातून ते कोट्यवधी रुपये कमावतात.
अशाच सर्वांचा परिचित चेहरा असलेला भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बद्दल आम्ही तुम्हाला काही सांगणार आहोत. क्रिकतेच्या मैदानाबरोबरच विराट कोहली याने सोशल मीडियाचे मैदानदेखील गाजवले आहे .
बॉलिवूडची ‘ देसी गर्ल ‘ प्रियांका चोप्रा हिला मागे टाकत विराट हा इन्स्टाग्रामवरील टॉप भारतीय सेलिब्रेटी ठरला आहे . एका इन्स्टा पोस्टसाठी विराट कोहली 5 कोटी रुपये तर बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा 3 कोटी रुपये मानधन आकारते .
इन्स्टाग्रामवर बक्कळ कमाई करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर नाव आहे ते म्हणजे स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो. रोनाल्डोचे सोशल मीडियावर करोडो चाहते आहेत. रोनाल्डो एका इन्स्टा पोस्टसाठी जवळपास 12 कोटी रुपये घेतो.
टॉपर इन्स्टाग्राम रिच लिस्टमध्ये जगभरातील टॉप 20 सेलिब्रेटीमध्ये स्थान मिळवणारा विराट हा एकमेव भारतीय सेलिब्रेटी ठरला आहे. गतवर्षी याच यादीत तो 23व्या स्थानावर होता. इन्स्टाग्रामवर विराटचे तब्बल 125 मिलियन फॉलोअर्स आहेत.
दुसरीकडे प्रियांका चोप्रा या यादीत 27व्या क्रमांकावर आहे. गतवर्षी ती यादीमध्ये 19व्या स्थानावर होती. तिचे इन्स्टाग्रामवर 64 मिलियन फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामच्या टॉप 100 सेलिब्रेटीमध्ये ती एकमेव बॉलिवूड सेलिब्रेटी आहे.