file photo

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  भारीयत क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला.

दरम्यान विराटची हि घोषणा होऊन काही कालावधी देखील झाला नाही तोच आता विराटने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. विराटने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे.

आयपीएल 2021 ची सांगता झाल्यानंतर आपण कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे विराट म्हणाला. कोहलीचा कर्णधार म्हणून आरसीबीसाठी अत्यंत खराब रेकॉर्ड होता. तो 2013 पासून कर्णधारपद सांभाळत आहे पण एकदाही सांघिक विजेतेपद पटकावू शकला नाही.

2016 नंतर, आरसीबीचा संघ गेल्या वर्षी प्लेऑफमध्ये पात्र ठरला होता. 2017 आणि 2019 मध्ये तो गुणतालिकेच्या तळाशी होता तर 2018 मध्ये संघ सहाव्या स्थानावर होता.

2016 चा हंगाम कोहलीसाठी उत्तम होता, त्या काळात त्याने 973 धावा केल्या. त्यानंतर केवळ 2018 मध्ये कोहली 500 धावांच्या पुढे पोहोचू शकला.

आयपीएल 2021 च्या हंगामात त्याने सात सामन्यांत 33 च्या सरासरीने धावा केल्या आहेत, ज्यात फक्त एक अर्धशतक आहे. नेमके काय म्हणाला विराट?

जाणून घ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार म्हणून ही माझी अखेरची आयपीएल स्पर्धा असणार आहे.

एक खेळाडू म्हणून मी माझा शेवटचा आयपीएल सामना खेळेपर्यंत आरसीबीच्या संघात असेल. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला पाठिंबा दिल्लाबद्दल आरसीबीच्या सर्व पाठिराख्यांचे आभार.