भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणातून विसर्ग सुरू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  शहर व जिल्हा सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे भंडारदरा निळवंडे व मुळा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

आगामी दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. मंगळवारी पाऊस झाला. तसेच बुधवारी काही भागात पावसाने हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.

बुधवारी सायंकाळी भंडारदरा धरणातून प्रवरानदी पात्रात ८१६ क्यूसेस, निळवंडे धरण २ हजार ३०१ क्यूसेस, नांदूर मधमेश्वर‍वर बंधारातून गोदावरी नदीत ३२ हजार ६९२ क्यूसेस, भीमा नदी २ हजार ९९९ क्यूसेस, मुळा धरणातून १ हजार ८५ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले.