Vishwakarma Yojana : मस्तच! आता कोणत्याही हमीशिवाय मिळणार 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज, जाणून घ्या योजना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vishwakarma Yojana : केंद्र आणि राज्य सरकार सतत सर्वसामान्य जनतेसाठी कोणत्या ना कोणत्या योजना राबवत असते. आज त्याचा फायदा देशातील करोडो लोक घेत आहेत. अशीच सरकारने आता एक शानदार योजना आणली आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला कर्ज मिळणार आहे.

ते देखील कोणत्याही हमीशिवाय. तुम्हाला आता विश्वकर्मा योजनेअंतर्गत एकूण 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत माहिती दिली आहे, तुम्हीदेखील सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकता. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “विश्वकर्मा योजना देशातील ही स्थानिक उत्पादने जागतिक बनवण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये पाठीचा कणा असतो, त्याप्रमाणे समाजजीवनात विश्वकर्मा सोबती खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

दैनंदिन जीवनात त्याशिवाय कल्पना करणे खूप अवघड आहे. आजही फ्रिजच्या जमान्यात अनेकांना लोकांना मडक्यातील पाणी प्यायला खूप आवडते, तसेच या मित्रांना ओळखून त्यांना आधार देणे ही काळाची गरज बनली आहे.

कोणत्याही हमीशिवाय मिळेल 3 लाखांचे कर्ज

तसेच विश्वकर्मा योजनेतून सर्व सहयोगींना प्रशिक्षण देण्यावर भर दिला आहे. प्रशिक्षणाच्या वेळी, सर्व सहभागींना सरकारकडून दररोज 500 रुपये भत्ता देण्यात येणार आहे. तसेच नवीन उपकरणासाठी 15,000 रुपये देण्यात येणार आहेत. इतकेच नाही तर आता वस्तूंच्या ब्रँडिंगमध्येही केंद्र सरकार सर्वसामान्य लोकांना मदत करणार आहे. त्या बदल्यात, जीएसटी नोंदणीकृत असणाऱ्या दुकानांवरच तुम्ही व्यवहार करावा अशी सरकारची देखील खूप इच्छा आहे.

यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले की, “सरकार लोकांना कोणत्याही हमीशिवाय व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे देणार आहे. ज्यात सरकार लोकांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे. इतकेच नाही तर नवीन टूल खरेदीवर प्रथमच 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात येणार आहे. त्याची परतफेड केल्यानंतर सर्वसामान्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.